Std:10 Subject: Marathi Marks: 20

Bait Ul Naseeb 
         URDU.SCHOOL
         FIRST UNIT TEST
               STD. 10 
              SUB. MARATHI
गुण २०
 
  .खालील गद्य उत्तारा वाचून त्यावर
 आधारीत दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.८ गुण
कृती १ : ( आकलन)
 १) शब्दजाल पूर्ण करा.२ गुण
 i) लेखिका हे पदार्थ मातीतून उचलून फुलात ठेवत.
_______________________
  | | | |
[ ] [ ] [ ] [ ]

ii) लेखिकेचा सासरी छळ होण्याची दोन कारणे.
_____________________________
१ )________ २) ________  

कृती2 (आकलन)

 १) कारणे द्या‌‌ . २ गुण
i) लेखिकेला दिवस दिवस शाळेत जाता येत नसे कारण.......‌‌  

शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत .मी त्यांच्या तोंडाकडे बघत असे पोटात भूक लागलेली असे. मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या कि मी लाडू चा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबी चा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. सर्वांना वाटायचं, मी चाफ्याची फुलं च
गोळा करते; पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा त्यावर घोटभर पाणी पिऊन मी वर्गात बसायची .
कधीकधी म्हशी मुळे दिवस दिवस शाळेत जाता येत नसे. आमच्या
चिखलदऱ्यात भराडी नावाची एक वनस्पती येते. चांगलं तळ हाता एवढं मोठं पान असतं. त्याला खाली एक काटा असतो. त्या भराडी चा काटा आहे माझं पेन. व भराडी च पान हा माझा कागद असे. म्हशींच्या मागे जात जात अ, आ, इ , ई उ, ऊ अशी अक्षर लिहिणं मी शिकू लागले. असं निसर्गाच्या सोबतीने लिहल, म्हणून शिकलेल कधीच विसरता नाही आलं.
  
आकृती ३. व्याकरण

१) लिंग ओळखा १ गुण
i ) कागद. ii) शाळा

२) पुढील अर्थाच्या शब्दांचे अनेकवचन शब्द लिहा १ गुण
i) तुकडा ii) काटा

कृती ४) स्वमत 2 गुण
 * ' निसर्गाच्या सोबतीने शिक्षण.' ही संकल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
   
               पद्य विभाग 
 
प्रश्न २ पुढील पद्या च्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा ५ गुण
कृती १ ( आकलन) २ गुण
 १) संत तुकाराम महाराज यांनी
 सांगितलेली साधू ची लक्षणे. 
१) ___________________
२)__________________
३) ___________________
४) __________________.
 
२) उत्तरे लिहा१ गुण
i) साधू ज्यांना हृदयी धरतात ते ......... 
ii) संत तुकाराम महाराज यांच्या मते, भगवंत ज्यांच्यामध्ये वास करतो ती व्यक्ती.........

     जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले|| १||

तो चि साधू ओळखावा | 
देव तेथे चि जाणावा || २||

मृदू सबाह्य नवनीत |
तैसे सज्जनांचे चित्त || ३ ||

ज्यासि आपंगिता नाही
त्यासि धरी जो हदयी | | ४ ||
 
दया करणे जे पुत्रासी
तो चि दासा आणि दासी || ५||
 

तुका म्हणे सांगू किती 
तो चि‌ भगवंताची मूर्ती. ||६ ||


कृती २ स्वमत २ गुण
  साधू कोणा कोणाला कशी मदत करतात , ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा.


प्रश्न ३. व्याकरण विभाग ७ गुण

i) सामासिक शब्दाचा विग्रह. करा. १ गुण
 १) यथा क्रम
  २) स्त्री पुरुष 
  
ii) समानार्थी शब्द लिहा.१ गुण
 १) चित्त 
  २) भगवंत

 iii) पुढील शब्दातील अक्षरांपासून 
   चार अर्थ पूर्ण शब्द लिहा. २ गुण
नवनीत . ____._____ ______ ____

iv) लिंग बदला १ गुण
  १ ) साधू. २) दास 

v) पुढील शब्दाचे भिन्न अर्थ लिहा. २ गुण
 i) ________ अंतर ________
ii) ________ भाव _________

Share this